spot_img
spot_img

डिग्रसच्या वादग्रस्त कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई व्हावी यासाठी पंचायत समिती समोर उपोषण सुरू

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रामवाडी सोलेवाडी निवृत्ती वाडी या विविध भागात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत १४ व १५ वा वित्त आयोग मार्फत कामे केलेली दाखवून त्या कामाची वेळे परस्पर लाटली असल्याचे तक्रार डिग्रस येथील रिपब्लिकन युवा सेनेचे राहुरी तालुका उपाध्यक्ष योगेश पवार यांच्यासह आदींनी निवेदनाद्वारे पंचायत समितीची बीडिओ यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की रामवाडी रस्ता कॉंक्रिटीकरण अनुजाती व नव बौद्ध घटक वस्ती विकास योजनेतून सुमारे ३ लाख १० हजाराची कामे केली तसेच बंदिस्त गटारीसाठी चार लाख ९५ हजार रुपयाची कामे झाल्याचे ग्रामपंचायत स्तरावर सांगण्यात येत आहे तर निवृत्ती वाडी ते महालदारा रस्ता मजबुतीकरण १५ व्या वित्त आयोगातून तीन लाख २९ हजार रुपयांची कामे केली असल्याचे ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात येत असले तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कामे न करता काम पूर्ण झाल्याचे दाखवून परस्पर बिले काढून भ्रष्टाचार व शासनाची फसवणूक झाल्याचे प्रसिद्धी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

निवेदनावर योगेश पवार जयकुमार पंडित श्याम जाधव यांच्या सह्या आहेत ग्रामपंचायत स्तरावर केलेल्या कामाची चौकशी होऊन दंडात्मक कारवाई करावी अन्यथा आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती समोर उपोषण सुरू करणार असल्याचे नमूद केले आहे .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!