लोणी दि.४( जनता आवाज वृत्तसेवा ):-शालेय शिक्षणासोबतच संस्कार शिक्षणावर प्रवरेचा भर असल्याने वेळोवेळी होणा-या विविध उपक्रमातून मुलांवर संस्कार होत असतात आजी-आजोबा म्हणजे चालते बोलते संस्कार विद्यापीठ आहे असे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे यांनी केले.
लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदीर येथील प्राथमिक विभागाच्या वतीने आयोजित आजी-आजोबा मेळाव्यात सौ. सरोदे बोलत होत्या. यावेळी प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छींद्र थेटे, राहाता बाजार समितीचे माजी सभापती बापुसाहेब आहेर, डॉ. विलायते, माजी शिक्षणाधिकारी विलायते, प्रवरा कन्या विद्या मंदीरच्या प्राचार्या भारती कुमकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिमा बढे आदीसह आजी – आजोबा उपस्थित होते.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात सौ. सरोदे म्हणाल्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आज संस्कारांची गरज निर्माण झाली आहे. दर्जेदार शिक्षणा सोबतचं मुलावर संस्कार व्हावेत यासाठी अनेक उपक्रम सुरु असतात यावेळी आजी-आजोबांचे पुजन करण्याबरोबरच त्याच्यांसाठी विविध स्पर्धा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमने सांगता झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिमा बढे यांनी तर सुञसंचालन दिपाली रहाणे आणि बनसोडे यांनी केले.



