लोणी दि.४( जनता आवाज वृत्तसेवा ):-शिक्षणासोबत परीपुर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरु असतात.बहि:शाल उपक्रम हा विद्यार्थ्यांसाठी समाजाभिमुख होत आहे.असे प्रतिपादन बहि:शाल शिक्षण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मानत संचालक डॉ.हरिश्चंद्र नवले यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय लोणी आणि बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे याच्या संयुक्त विद्यमाने वक्ते , ग्रंथ अन्वेषक व केंद्र कार्यवाह ,संयुक्त कृती सत्रात डाॅ.नवले बोलत होते. यावेळी संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, ,डॉ. अतांत्रिक विभागाचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, विद्यापीठाचे लेखा कुलसचिव डाॅ.मयुर चोरडीया ,प्राचार्य डॉ. अनुश्री खैरे,उपप्राचार्या राजश्री तांबे,प्रा.कांचन देशमुख,प्रा.संजय वाणी आदी मान्यवर व जिल्हातील महाविद्यालाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये संस्कृत या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात यावी अशी सुचना डॉ .शिवानंद हिरेमठ यांनी मांडली.तर डाॅ.प्रदिप दिघे यांनी विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन जीवनामध्ये हे उपक्रम कसे फायद्याचे ठरेल असे उपक्रम व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करुन
या विभागामार्फत लोकशिक्षण व सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले जाते .त्यानंतर व्याख्यानमाला ,शिबिरे ,चर्चासत्र कार्यशाळा गरजेवर आधारित कार्यक्रम आणि ज्ञानविज्ञान वाचन चळवळ आदी कार्यक्रम आयोजित करण्यावर भर द्यावा असे सांगितले. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या कालावधीमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा कृती आराखडा तयार करण्यात आला.
या सत्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दीडशे पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाॅ. अनुश्री खैरे यांनी केले .सूत्रसंचालन प्रा. सुनील आल्हाट तर आभार प्रा. अर्चना घोगरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले



