spot_img
spot_img

‘प्रोटान’ राज्य अधिवेशनासाठी हजारो शिक्षक जाणार : जिल्हाध्यक्ष धनवडे

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (ट्रेड युनियन) संलग्न प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अर्थात प्रोटान शिक्षक संघटनेचे पाचवे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवारी (दि. ०८) सकाळी ११.०० वा. ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत रॉयल पॅलेस हॉल, पांढरकवडा, यवतमाळ येथे होत असून अधिवेशनासाठी जिल्हाभरातून हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जाणार असल्याची माहिती प्रोटानचे जिल्हाध्यक्ष आर. एम. धनवडे यांनी दिली.

अधिक माहिती देताना जिल्हाध्यक्ष धनवडे यांनी सांगितले कि, सदर अधिवेशनाचे उद्घाटन अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक हे करणार असून अध्यक्षता राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय महासचिव गोरक्षनाथ वेताळ हे करणार आहेत. यावेळी डॉ. मुरलीधर जाधव, कैलास मडावी, राजेंद्र राजदीप, डॉ. सिद्धार्थ कांबळे, प्रा. डॉ. मोहन मिसाळ, रमेश मकासरे, प्रा. डॉ. संजय धाबर्डे हे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे बहुजन समाजाला शिक्षण व नोकरीपासून वंचित ठेवण्याचे एक षडयंत्र, नवीन पेंशन योजनेचे बहुजन कर्मचाऱ्यांच्या वर्तमान आणि भविष्यावर होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय, कामगार कायद्यात केलेल्या बदलांचा बहुजन समाजावर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाय, महाराष्ट्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रचलित संघटना असूनही बहुजन समाजातील कर्मचाऱ्यांवर वाढता अन्याय, अंशतः अनुदानित आणि समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षकांच्या गंभीर समस्या व उपाय, ६२ हजार शाळांना दत्तक देणे आणि कंत्राटी भरती हे महाराष्ट्र शासनाचे आणि शासक वर्गाचे शिक्षणाचे संपूर्ण खाजगीकरण करण्याचे धोरण, शिक्षण क्षेत्रातील गंभीर समस्यांच्या अनुषंगाने निर्णायक लढा करण्यासंदर्भात आर.एम.बी.के.एस प्रोटानची भूमिका या आणि इतर शिक्षक व शिक्षण क्षेत्राशी संबधित विषयांववर गंभीर विश्लेषण व चर्चा केली जाणार आहे.

तरी ‘प्रोटान’ राज्य अधिवेशनासाठी जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आवाहन ‘प्रोटान’चे जिल्हाध्यक्ष आर. एम. धनवडे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!