spot_img
spot_img

बाजार समिती सभेतील आरोपांची चौकशी व्हावी- आ. कानडे  

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली असून याबाबत विधी मंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नुकतीच बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विवध विषयांवर चर्चा झाली. सभेप्रसंगी संचालकांना आगाऊ रक्कम देण्यात आल्याचे तसेच पेट्रोल पंपावरून लाखो रुपयांचे पेट्रोल दिले गेल्याचे यासह इतर आरोप झाले. मागील काळात बाजार समितीच्या संचालकांना लाखो रुपयांची आगाऊ रकम देण्यात आल्याचे तसेच पेट्रोल पंपावरून लाखो रुपयांचे पेट्रोल, डीझेल देण्यात आल्याचा आरोप करून यास संचालक मंडळाची परवानगी नसेल तर याप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

या आरोपात तथ्य असल्यास हा प्रकार गंभीर स्वरुपाचा आहे. या आरोपांची चौकशी करण्यात यावी, आपण याबाबत सविस्तर कागदपत्रांसह माहिती मागवून विधीमंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आ. कानडे यांनी म्हटले आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!