spot_img
spot_img

साई निर्माणच्या अदिती ची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- साई निर्माणच्या अदिती ची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे.

असे म्हणतात की, कष्ट, जिद्द व चिकाटी हे नाशीबालाही पराभूत करते…. या वाक्याला साजेशी कामगिरी साई निर्माण ज्युनिअर कॉलेज शिर्डीची विद्यार्थ्यांनी अदिती संजय वाघमारे हिने केली आहे.

नुकत्याच झालेल्या निवड यादीमध्ये महाराष्ट्र अंडर १९ क्रिकेट संघात अदितीची निवड झाली असून ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या अद्वितीय कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा श्री विजुभाऊ कोते पाटील, उपाध्यक्ष मा श्री ताराचंद कोते पाटील, सर्व संचालक, प्राचार्य, क्रिडा संचालक, सर्व शिक्षक व पालक यांनी तिचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!