spot_img
spot_img

दवणगांव येथे बिबट्याने पाडला बोकडाचा फडशा

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील शेतकरी दत्तात्रय सिताराम डुकरे यांच्या शेतातील वस्तीवर सुर्यस्ताच्यापूवीच बिबट्याने बोकडाचा फडशा पाडण्याची घटना नुकतीच घडली.

याबाबत माहीती अशी कि डुकरे यांच्या पाळीव शेळ्या त्यांच्या शेताजवळ पडीक जमिनित चरत होत्या. त्यामध्ये एक वर्षं वयाचा सुदढ असा बोकड चरत होता. सायंकाळी ६ वाजता बिबल्याने बोकडावर हल्ला केल्याने शेळ्या ओरडू लागल्या. दतात्रय डुकरे यांचा मुलगा सिध्दार्थ डुकरे यांनी हि घटना प्रत्यक्ष पहाताचा आरडा ओरडा केला. त्यामुळे जवळचे शेतकरी जमा झाले.मात्र बिबट्याने बोकडाला शेजारी राहात असलेल्या चांगदेव खपके यांच्या उसाच्या शेतात ओढून बोकडाचा फडशा सुर्यास्तापूर्वी पाडला. यापूर्वी या भागात पाळीव शेळ्या,मेंढ्या, छोटी जनावरे,कुत्रे यांची शिकार झालीआहे. पंधरा दिवसापूर्वी शेडगे नावाच्या युवकावर दुचाकीवरून येत असताना हल्ला चढवला होता. या भागात बिबटे जेरबंद करण्यासठी पिंजरे सुद्धा लावले मात्र बिबटे – वाघ यामध्ये बंदिस्त होत नाही. त्यामुळे दवणगांव आंबी भागात नागरीका मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तरी संबधीत विभागाने त्वरीत योग्य ती खबरदारी घ्यावी असे मागणी समस्त ग्रामस्थ दवणगांव यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!