spot_img
spot_img

धर्मासाठी संघटित व्हा – ह.भ. प. सिनारे महाराज

आंबी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- आपल्या धर्मासाठी आता संघटीत झाले पाहिजे. बालवयातच परमार्थाची आवड निर्माण व्हावी यासाठी मदिरात हनुमान चालीसाचे पठण होण्याची आता गरज आहे.एक हरिनाम सप्ताह करायला ग्रामस्थांना दोन लाख रुपये खर्चे येत असेल पण सप्ताह काळात निदान दोन व्यक्ती मध्ये तरी परमार्थाची आवड निर्माण झाली पाहीजे तरच गावात सप्ताह केल्याच सार्थक झाले समजाअन्यथा दोन लाख पाण्यात गेले असे समजावे.असे विचार हभप मनोज महाराज सिनारे यांनी दक्षिण मुखी हनुमान केसापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या हरिकिर्तनातून भाविकांना उपदेश करलाना व्यक्त केले.

यावेळी महाराज मंडळी, गावातील भजनी मंडळ, अनमेल सहकार्य करणारे भाविक यांचा सप्ताह कमेटी व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचे संतपुजन करण्यात आले. तसेच गावतील भजनी मंडळाला स्वःकचरू टाकसाळ यांच्या स्मरणार्य अशोक टाकसाळ व राधाकिसन टाकसाळ यांनी टाळ, मृदंग, विना दिलाबद्दल लक्ष्मीबाई टाकसाळ यांचा व गावातील युवा किर्तनकार कुणाल महाराज बोल्हे व सागर महाराज कुन्हे यांचा महाराजाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटीआरती होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. वरुणराजाचे आगमनात सुद्धा भाविकांनी नामयज्ञ मंडपात शांततेन महाप्रसाद घेतला.हा सप्ताह यशस्वीरित्या पार पडण्यासाठी स प्ताह कमेटीसह समस्थ ग्रामस्थ केसापूर यांनी विशेष परीश्रम घेतले.. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकोत टाकसाळ व सुरेश टाकसाळ यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!