लोणी दि.५( जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी चिंचोली-मोहु तालुका सिन्नर या महाविद्यालयात प्रथम वर्ष डी आणि बी फार्मसी च्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय तांबे यांनी दिली.
प्रवरा सिंधू छाया कॅम्पस नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची, परिसराची, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विविध विभाग यांची ओळख यानिमित्ताने करून दिली जाते. सीनियर विद्यार्थी आणि नवीन विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय या निमित्ताने साधला जातो. उपस्थित पालकही महाविद्यालयाबद्दलची माहिती या निमित्ताने जाणून घेत असतात. उपस्थित सर्व विद्यार्थी व पालक यांना प्रेझेंटेशनद्वारे महाविद्यालयाची तसेच संस्थेची संपूर्ण माहिती सादर करण्यात आली. सीनियर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत या निमित्ताने व्यक्त केले. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या विभागांविषयीची माहिती विद्यार्थी व पालक यांना दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शुभम जाधव आणि कु. दिपाली आरिंगळे यांनी फार्मसी क्षेत्रातील विविध संधी आणि विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रवरा सिंधू छाया कॅम्पस नाशिक येथील महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य उपस्थित होते. महाविद्यालयाचे अकॅडेमीक विभागप्रमुख प्रा. सुप्रिया शिंदे, प्रा. योगेश ठोंबरे, प्रा. धीरज चेचरे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.



