spot_img
spot_img

नेवासा फाटा येथील रोज लँड स्कूलच्या खेळाडूंनी अमरावती येथे पार पडलेल्या आष्टीडू मर्दानी आखाडा क्रीडा स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक

नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा  :- अमरावती येथे पार पडलेल्या १८  व्या राज्यस्तरीय आष्टेडु मर्दानी आखाडा क्रीडा स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करीत नेवासा फाटा येथील रोज लॅण्ड स्कूल च्या खेळाडूंनी १  सुवर्णपदकांसह १ रौप्यपदक तर ३  कांस्यपदके पटकाविली.

अमरावती डॉ . बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दि . ३०  सप्टेंबर २०२३  ते २  ऑक्टोबर २०२३  रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या महाराष्ट्र आष्टेडु मर्दानी आखाडा असोसिएशन द्वारा या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेत १२  , १४  , १७ , १९  वर्षे आतील वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत पुणे,मुंबई,कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती,नागपूर, लातूर ,अहमदनगर, सांगली, वसीम,सातारा,धुळे,वर्धा, भंडारा,यवतमाळ, गोंदिया,या जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते.

या स्पर्धेत नेवासा येथील रोज लॅण्ड स्कूल चे खेळाडू आर्या जाधव हिने सुवर्णपदक तर विक्रांत निपुंगे याने रौप्यपदक व समर्थ उंदरे , ओम म्हस्के , राजवीर परदेशी यांनी कांस्यपदक पटकावले.

या सर्व खेळाडूंनचे संस्थेचे अध्यक्ष श्री.भाऊसाहेब विठ्ठलराव अंबाडे पाटील व संचालक श्री.अजित भाऊसाहेब अंबाडे पाटील , प्राचार्य सुनीलकुमार जैन यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मास्टर सूरज पटारे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!