spot_img
spot_img

ममदापूर येथील कत्तलखान्यावर छापा १ लाख ८३ हजार किमतीचे गोवंशाची सुटका

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- दि. ५ रोजी डीवायएसपी  संदीप मिटके यांना गुप्त माहिती मिळाली की,कदम वस्ती ममदापूर ता.राहाता येथील अक्षय भास्कर कदम याचे घराजवळ असणारे पत्र्याचे शेडमध्ये वसीम हानिफ कुरेशी, रा. ममदापूर संगनमत करून कत्तलीकरिता गोवंश जातीचे जनावरे आखुड दोऱ्याने बांधून ठेवलेबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेश दिल्याने पथकातील इरफान शेख,अशोक शिंदे,श्याम जाधव यांनी पंचासह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून १  लाख ८३  हजार रुपयाच्या गोवंश जनावरे ताब्यात घेऊन त्यांची गोशाळेत रवानगी केली.

तसेच दोन्ही आरोपींविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक अशोक शिंदे यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नं. ६००/ २०२३ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायदा अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक नगर, श्रीमती स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, डीवायएसपी  संदीप मिटके यांचेमार्गदर्शनाखाली हे.कॉ.इरफान शेख,पो. ना. अशोक शिंदे ,श्याम जाधव यांनी केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!