श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):-भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने महाविजय २०२४ साठी भाजपाने आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषारजी भोसले यांनी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या शिर्डी लोकसभा निवडणूक प्रमुख पदी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव मुठे यांची नियुक्तीच पत्र आचार्य तुषारजी भोसले यांनी दिले आहे.
मुठे यांनी भाजपाच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हनुन त्यांनी या विभागात चांगल काम केले होते आणि याच कामाची दखल घेउन त्यांना पंढरपुर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक मध्ये प्रचार साठी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने मोठी जबाबदारी देण्यात आली होती या ही पोटनिवडणूकीत मुठे यांनी पंढरपुर येथील मठातील सर्व दीकिर्तनकार,प्रवचकार यांना आचार्य भोसले यांच्या मार्गदर्शना खाली भेटुन तेथील विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यात मुठे यांनी प्रयत्न केले.
श्रीक्षेत्र देहू येथील जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदीर लोकअर्पन सोहळ्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होता या ही कार्यक्रम ची आध्यात्मिक आघाडी म्हनुन मुठे यांच्या वर मोठी जबाबदारी होती.मुठे यांनी हे सर्व गोष्टी यशस्वी करुन दाखवल्या आणि याचं कामाची दखल घेउन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व या आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषारजी भोसले यांनी मुठे यांची नियुक्ती केली .
मुठे यांच्या नियुक्तीच ह,भ,प,रामगिरीजी महाराज,ह,भ,प,निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर,प्रकाश महाराज बोधले,ना,राधाकृष्ण विखे पा.माजी मंत्री राम शिंदे,भाजपाचे जिल्हाअध्यक्ष विठ्ठलराव लंघे,माजी आ,चंद्रशेखर कदम,बाळासाहेब मुरकूटे ,वैभव पिचड,स्नेहलताई कोल्हे,,भाजपाचे माजी जिल्हाअध्यक्ष राजेंद्र गोंदकर ,भाजपाचे जिल्हा सरचिटणिस नितिन दिनकर,ओबीसी मोर्चाचे प्रदेशउपाध्यक्ष प्रकाश चित्ते,जि,प,चे गटनेते जालींदर वाकचौरे,नितिनराव कापसे,भाजयुमोचे प्रदेश सचिव अॕड श्रीराज डेरे सतीश कानवडे,यांच्या सह शहर व तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारी यांनी मुठे यांच अभिनंदन केले आहे.



