राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा):- मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा च्या मार्फत हजारो रुग्णांना मदत मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख श्री जितेंद्र जाधव यांना महा राष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शिर्डी येथे कार्यक्रमामध्ये “देवदूत” पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना जितेंद्र जाधव यांनी सांगितले की मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मागील १ वर्षापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत समाजातील गरीब व गरजू वंत नागरिक यांना ९० प्रकारच्या विविध आजार तसेच विविध प्रकारचे ऑपरेशन करणे साठी या कक्षा मार्फत निधी देण्यात येतो.
यामध्ये हृदय प्रत्यारोपण ,यकृत प्रत्यारोपण,किडनी प्रत्यारोपण,बोन मारो प्रत्यारोपण,फुफ्फुस प्रत्यारोपण ,हाताचे प्रत्यारोपण ,कर्करोग,अपघात ,हृदयरोग,डायलीसीस,केमोथेरिपी,लहान बालकांचे ऑपरेशन,मेंदूचे विकार,गुडघा प्रत्यारोपण,विद्युत अपघात रुग्ण या सारख्या ९० प्रकारच्या विविध ऑपरेशन साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत मदत करण्यात येते आता पर्यन्त अहमदनगर जिल्ह्यात जवळपास १२ कोटी रुपये मदत मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत वितरित करण्यात आली आहे याकामी मुख्यमंत्री सहा यता कक्षाचे ओ एस डी श्री मंगेश चिवटे व राम राऊत यांचे अनमोल सहकार्य लाभत असल्याचे श्री जाधव यांनी सांगितले आहे.
या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे,जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील ,आमदार नरेंद्र दराडे,डॉक्टर विश्वासराव आरोटे,डी वाय एस पी सोमनाथ वाकचौरे ,संदीप मिटके,विजयराव कोते,नीलेश कोते,शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते ,विजय
जगताप,राजकुमार जाधव,सचिन चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते सूत्र संचालन श्री राकेश रायसोनी यांनी केले.
मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत पिवळे व केसरी शिधापत्रिका यांना महात्मा फुले जनआरोग्य योजने व प्रधानमंत्री आरोग्य योजने मार्फत सरसकट रु पाच लाख पर्यन्त दवाखान्याच्या कामासाठी सरसकट मदत करण्याच्या निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे तसेच या योजने मधून सुद्धा एखाद्या रुग्णांवर उपचार न झाल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील समन्वयक यांचे सोबत संपर्क करावा -जितेंद्र जाधव (अहमदनगर जिल्हा प्रमुख मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष )



