spot_img
spot_img

राहाता येथे मोबाईल चा स्फोट होऊन तरुण जखमी

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):- मोबाईलचा स्फोट होऊन तरुण जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी राहता शहरांमध्ये घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की राहता येते चितळी रोड लगत श्री संतोष तर कसे यांच्या मालकीचे भाग्यश्री मोबाईल शॉपी हे दुकान असून ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानांमध्ये दुरुस्ती साठी आलेले मोबाईल हे दुरुस्त करत असताना एम आय कंपनीच्या मोबाईलचा स्फोट होऊन ते जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत जखमी श्री संतोष तर कसे यांनी बोलताना सांगितले की ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानांमध्ये बसले असता एम आय कंपनीचा मोबाईल ते दुरुस्त करत होते सदरील मोबाईल दुरुस्त करत असताना मोबाईल हा चार्जिंगला लावलेला होता व मोबाईल त्यांनी हातामध्ये पकडलेला होता अचानक मोबाईलचा स्फोट होऊन त्यांच्या हाताला व पोटाला जखम झाली व त्यानंतर दुकानांमध्ये संपूर्ण धुराचे साम्राज्य पसरले होते त्यामुळे श्री तर कसे हे भयभीत होऊन दुकानाच्या बाहेर त्यांनी पळ काढला.

यामध्ये त्यांचा शर्ट सुद्धा जळाल्याचे दिसून आले ही घटना शेजारील दुकानदारांना समजतात शेजारील दुकानदारांनी तात्काळ त्यांच्या दुकानांमध्ये भाव घेतली व श्री तर कसे यांच्या अंगावरील पेटलेला शर्ट हा भिजवला व त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले रुग्णालयामध्ये दाखल केले असता श्री तरकसे यांच्यावर तात्काळ प्रथमोपचार करण्यात आले

नागरिकांनी मोबाईलचा वापर करत असताना शक्यतो आपला मोबाईल हा पॅन्टच्या खिशामध्ये ठेवावा म्हणजे भविष्यात मोबाईलचा स्फोट वगैरे जरी झाला तरी आपल्या शरीराला कमीत कमी इजा पोहोचेल याची नागरिकांनी काळजी घ्यावी-

डॉक्टर संतोष मोकळ(एम.एस.सर्जन)

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!