लोणी दि.१०( जनता आवाज वृत्तसेवा ):-वास्तुशिल्प कलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर परिसरात प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर लोणीच्या विद्यार्थ्यानी स्वच्छता मोहीम राबवली.
यामध्ये मंदिर परिसरात पडलेले प्लास्टिक वस्तू गोळा करुन स्वच्छता करण्यात आली. ऐतिहासिक वास्तू त्यांचे महत्त्व आणि स्वच्छता याबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महाविद्यालयाच्या वतीने राबवण्यात आला. या उपक्रमासाठी आर्किटेक तेजस्विनी घोलप यांनी परिश्रम घेतले. याबरोबरच स्वच्छतेनंतर येथे हेरिटेज वॉक चे आयोजन देखील करण्यात आले होते, त्यामध्ये प्रा. कपिल बु-हाडे यांनी मंदिराची माहिती देत लाईव्ह स्केचिंग ची कार्यशाळा घेतली. यामध्ये विविध प्रकारच्या पेन्सिल आणि पेन्स चा वापर करून स्केचिंग चे विविध प्रकार शिकवले या उपक्रमासाठी प्राचार्य तेजश्री ठाणगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.



