नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा):-नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील दलित वस्तीला पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा व्हावा या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे उप अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
प्रवरासंगम येथील दलित वस्ती मध्ये वार्ड नंबर पाच मध्ये मागील एक वर्षापासून कमी दाबाने लाईट मिळते. वारंवार सांगूनही कुठल्याही प्रकारची दखल वीज महामंडळ घेत नाही. तसेच कमी दाबामुळे दलित वस्तीतील घरांमध्ये अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे या होणाऱ्या आर्थिक नुकसानीस महावितरण कंपनी जबाबदार आहे.
म्हणून वरील गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर महावितरण कंपनीने योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा पुढील आठ दिवसांमध्ये योग्य ती कारवाई नाही झाली तर प्रवरासंगम-टोका ग्रामस्थांकडून महावितरणच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल त्यानंतर होणाऱ्या परिणामास महावितरण कंपनीच जबाबदार राहील असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.
प्रसंगी महावितरण कंपनीच्या उप अभियंत्यास निवेदन देताना नितीन भालेराव, बाळासाहेब मोरे, गोपीनाथ भालेराव ,राजेंद्र फाजगे व ग्रामस्थ उपस्थित होते.



