spot_img
spot_img

संत महिपती महाराजांच्या समाधीची महापूजा व अभिषेक माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे व हभप बाळकृष्ण महाराज कांबळे हस्ते

राहुरी शहर १३( जनता आवाज वृत्तसेवा ):-आज गुरुवार दि.१३ जुलै २०२३ रोजी संत महिपती महाराजांच्या समाधीची महापूजा व अभिषेक माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे व हभप बाळकृष्ण महाराज कांबळे ह्यांचे करण्यात आली.देवस्थानच्या वतीने अविनाश कांबळे ह्यांनी सत्कार केला.

ताहाराबाद येथे संत महिपती महाराज देवस्थान येथे यात्रा सुरु झाली असून येथे भरणाऱ्या पांडुरंग उत्सवासाठी जिल्ह्याच्या तसेच तालुक्याच्या विविध भागातून पायी दिंड्या मोठ्या प्रमाणात येत आहे.पांडूरंग महोत्सव (गोपाळकाला ) निमित्ताने मंगळवारी सायंकाळी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी गेलेल्या परतीच्या दिंडी पालखीचे आगमन झाले.
ग्रामस्थांनी सडा रांगोळीने गाव सुशोभित केले होते. भजनी मंडळी व सनई ताफा यांच्या तालावर भाविकांनी फेर धरला. पालखीचा मानाचा अश्व नाचवून स्वागत करण्यात आले.
बुधवारी सकाळी गावामध्ये भिक्षा कार्यक्रम, अभिषेक, काकड आरती नैवेद्य दाखविला गेला. हरीपाठ व उत्सवासाठी आलेल्या दिंड्यांचे स्वागत केले गेले. यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून लाखोच्या संख्येने भावी दर्शनासाठी गर्दी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ताहाराबाद येथील यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पांडुरंगाची पावले पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी हे आहे.तालुक्यातील ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सकाळी सहा वाजता आहे. मंदिरात फरशीवर दोन फूट रुंदीच्या कापडावर सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री पांडुरंग हळदी-कुंकूचा सडा टाकून ते झाकले जाते. त्याची काकडा आरती नंतर उत्सव परंपरागत पद्धतीने सुरू झाला. दि. १७ जुलैला पाऊलघडीच्या भाविकांची श्रद्धा आहे. ते बघण्यासाठी भाविकांची गर्दी असते. कार्यक्रमाने पांडुरंग उत्सवाची सांगता होईल.
आज पासून ते १५ जुलै २०२३ पर्यंत विविध नामवंत किर्तन कारांचे भजन आदि कार्यक्रम ठेवण्यात आले असून १५ रोजी सकाळी ९वाजता हभप बालकृष्ण महाराज कांबळे ह्यांचे काल्याचे किर्तन तर दुपारी ४ वाजता सरला बेट येथील महंत रामगिरी महाराज ह्यांचे गोपाल काल्याचे किर्तन व दही हंडीचा कार्यक्रम होणार आहे.
 प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या ताहाराबाद येथील महिपती महाराज देवस्थान येथे कमिका एकादशी निमित्त आजपासून सुरू झालेल्या पांडुरंग उत्सवाच्या निमित्ताने महिपती महाराजांच्या समाधीची पूजा करण्याचे भाग्य मला मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी व्यक्त केली.
आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांचा सत्कार यात्रा कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय हारदे,उपाध्यक्ष रमेश हारदे सीताराम झावरे,सरपंच निवृत्ती घनदाट, उपसरपंच पप्पू माळवदे, बाजार समितीचे संचालक मारुती हारदे, अंजाबापू गागरे, फिरोज शेख, बापू जगताप,जालिंदर मुंढे, गीताराम वाबळे,रवींद्र गागरे,मंगेश विधाते, वसंत बिडवे, रमेश औटी, शहाजी झावरे, अर्जुन पवार, राजू हारदे, दत्तात्रय शिंदे, भारत रोकडे, किरण घनवट, सीताराम हारदे, शिवाजी झावरे, गणेश हारदे,सोपान पटारे आदि उपस्थित होते.संस्थानच्या वतीने उपाध्यक्ष अविनाश कांबळे यांनी आमदार तनपुरे यांचा सत्कार केला. यावेळी विश्वस्त अशोक किनकर उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!