श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ): – अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या विविध जिल्हा पातळीवरील स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन करीत येथील रामराव आदिक पब्लिक स्कूलने आपला दबदबा कायम ठेवला असुन अनेक खेळाडूंची पुणे विभागिय पातळीवर निवड झालेली आहे. नुकत्याच लोणी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय 17 वर्षाखालील शालेय फुटबॉल स्पर्धेत शाळेच्या संधाने विजेतपद पटकावित सोलापूर येथे होणा-या पुणे विभागिय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
यानंतर मैदानी स्पर्धेत जिल्हा स्तरावर 15 खेळाडूची प्रथम क्रमांकाने निवड झालेली आहे. पाथर्डी येथे झालेल्या मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलीनी उपविजेतपद पटकावले आहे. यामध्ये कु. अक्षिता भंडारी या इ. 8 वी च्या विदयार्थीनीची विभागिय पातळीवर निवड झालेली आहे. 14 वर्षाखालील कबडडी मुलांच्या संघाची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे. या सर्व संघातील यशस्वी खेळाडूना शाळेचे प्रभारी प्राचार्य प्रदिप गोराणे समन्वयक प्रसाद मुंडलिक, क्रीडा शिक्षक महेश खंडागळे, किरण कहांडळ, अभिषेक आढांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबददल त्याचे शाळेचे कार्यकारी विश्वस्त अविनाश आदिक, श्रीरामपूर च्या माजी नगराध्यक्षा कु. अनुराधाताई आदिक, सर्व संस्था सदस्य तसेच शाळेचे प्रभारी प्राचार्य प्रदिप गोराणे व समन्वयक प्रसाद मुंडलीक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. व यशस्वी विदयार्थ्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



