कोल्हार दि.१६( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेमध्ये माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री सुधीर मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना वाचनाची गोडी मनुष्याचे जीवन घडविण्यासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला अपडेटेड ठेवले पाहिजे आणि त्यासाठी दररोज वेगवेगळी वर्तमानपत्रे वाचली पाहिजेत .त्याचप्रमाणे टीव्हीवरील बातम्यांनी आपल्याला आपल्या आजूबाजूच्या घडामोडींबाबत माहिती मिळत असते. मोबाईलच्या जगामध्ये वाचनाची गोडी हरवत असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले आणि विद्यार्थ्यांना मोबाईलचा कमीत कमी वापर करावा आणि त्या ऐवजी आपला वेळ शालेय तसेच शालेय उपयोगी साहित्याचे वाचन करण्यामध्ये घालवण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले
.याप्रसंगी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या संलग्न असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पूरक पुस्तकांचे पुस्तकदान केले. यावेळी मुलांनी पन्नास हजार रुपयांची पुस्तके विद्यार्थ्यांनी विद्यालयास दान केली .विविध विद्यार्थ्यांनी याप्रसंगी अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रा बद्दलची माहिती सादर केली .प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस इ कडू ,एस.जी. आहेर, जी. व्ही.तांबे, ए.डी. म्हस्के आणि एस.बी. आव्हाड यांनी प्रयत्न केले.



