लोणी दि.२०( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. शिवानी किरण कडू हीची नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव इंद्रधनुष्य मध्ये सांस्कृतिक नृत्य प्रकारामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी विद्यापीठात संघात निवड झाल्याची माहिती कृषि संलग्नित महाविद्यायाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे यांनी दिली.
या स्पर्धा नुकत्याच राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात पार पडल्या.या युवा महोत्सवात कृषी महाविद्यालयातील एकूण ७ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. यामध्ये अनुक्रमे शिवानी कडू, गायत्री सुपेकर, गायत्री लबडे,ईश्वरी अवाशंक , अनुजा लंवाडे, ऋतुजा काळे, सायली मराळे या विद्यार्थ्यांचा सामावेश होता. यातील कु. शिवानी कडू हीची शास्त्रीय नृत्यासाठी विद्यापीठ संघात निवड झाली.तिला या यशामध्ये महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. दिपाली तांबे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले .
कु. कडु हिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णा साहेब म्हस्के पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खा.डॉ. सुजय विखे पाटील , अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, सहसचिव श्री भारत घोगरे,अतांञिकचे संचालक डाॅ. प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले



