राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):–किया मोटर्स चे अधिकृत वितरक असलेल्या पिपाडा व्हील्स यांना अहमदनगर सह बीड जिल्ह्याचे वितरक म्हणून अधिकृत पत्र मिळाल्याबद्दल पिपाडा मोटर्स कर्मचारी यांचे वतीने पिपाडा व्हील्स चे संचालक श्री प्रितेश पिपाडा यांचा सत्कार करण्यात आला प्रितेश पिपाडा यांनी आपले शिक्षण लंडन येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुरवातीला टाटा मोटर्स च्या पिपाडा मोटर्स या फर्म मध्ये काम करतानाच अल्पावधीमध्ये आपल्या कौशल्याच्या जोरावर गगन भरारी घेतली.
त्यानंतर 2022 मध्ये किया मोटर्स इंडिया या कम्पनी चे अधिकृत वितरक म्हणून नियुक्ती झाली अल्पावधीमध्ये ग्राहक सेवा ,ग्राहक समाधान,तत्पर सेवा या जोरावर पिपाडा व्हील्स यांना नुकतीच किया मोटर्स चे अहमदनगर सह बीड जिल्ह्याचे अधिकृत वितरक म्हणून नियुक्ती झाली त्यांच्या या नियुक्ती बद्दल पिपाडा मोटर्स कर्मचारी यांचे वतीने श्री प्रीतेश पिपाडा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजी गोरे,अभिलाष पाटोडी,धिरज मंडलिक,संतोष तर कसे,राहुल जाधव,विनायक तरते,सोमनाथ मुजमुळे आदी उपस्थित होते.



