सात्रळ ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहुरी तालुक्यातील रामपुर येथे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांचे रामपुर गावाची पारंपारिक ओळख असलेले दशाआवतरी खेळातील मुखवटे नाचुन जंगी स्वागत करण्यात आले.
रामपुर येथे आमदार सत्यजित तांबे आले असता येथील ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संरपच मीनाताई मोरे होत्या तर प्रमुख पाहुणे पंकज कडू हे होते.
यावेळी आ.सत्यजित तांबे म्हणाले, आज मला खरोखर आनंद होतो की रामपुर ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. माझा मतदार संघ फार मोठा असुन प्रत्येक ठिकाणी मतदार आपुलकीने बोलवतात तसेच तरूणांनी ज्ञानदानाचे मंदीर उभारणे गरजेचे आहे. तसेच घटक शिक्षाणाचा प्रवाहात आणणे गरजेचे आहे.तसेच परिसरातील पदवीधर माझ्या पाठीशी राहुन मोलाची साथ दिली. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. रामपुर सोसायटीचे चेअरमन म्हणाले, आ. सत्यजित तांबे हे तरूण वर्गासाठी एक आदर्श आहे. तसेच त्यांची जनतेची कामे सोडविण्याची पद्धत एक आगळी वेगळी आहे. तरूणांनी देखील त्यांचा आदर्श घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. भाऊसाहेब पेटकर म्हणाले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पावलावर पाऊल आ. सत्यजित तांबे पदवीधाराचे अडचणी सोडवत आहे. तसेच नाशिक पदवीधर मतदार संघ अतिशय मोठा क्षेत्रफळ असलेला मतदार संघ असताना रामपुर गावाला वेळ दिला, ही रामपुर गावाच्या दुरष्टीने फार महत्वाचे आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवर्तन मंडाळाचे अमोल नालकर, संतोष मोरे, विनोद लोंखडे, अरूण भोसले, जितेल साबळे, विनोद मोरे, विकास लोंखडे यांदीनी परिश्रम घेतले.
यावेळी विक्रांत कडू, किरण कडू उपसरपंच राहुल साबळे, दत्तात्रय लोंखडे, भाऊसाहेब पठारे, दिलीप लोंखडे, दादासाहेब भोसले, बाजीराव डोखे, सोपान नालकर, ज्ञानदेव मोरे, बाळासाहेब खळदकर, बाबासाहेब नालकर, आप्पासाहेब थेटे, राजेंद्र सरोदे, सोमनाथ नालकर, पांडुरंग नालकर, मच्छिंद्र मोरे, विलास खळदकर, गंगा लोंखडे, अमिन इनामदार, प्रदीप भोसले, बाळासाहेब कदम, तान्हाजी साबळे, नरेंद्र पठारे, बाबासाहेब पठारे, नामदेव जगताप, संदीप शरमाळे, अजित देठे, सचिन खर्डे, प्रमोद नालकर, सतिश नालकर, बाळासाहेब साबळे, संजय भोसले, सुरेश शिरसाठ, सिताराम पठारे, कैलास अनाप, दिलीप पाळंदे, दिपक लोंखडे, गोरक्ष नालकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश कडलग यांनी केले तर आभार भगीरथ नालकर मानले



