लोणी दि.२२( जनता आवाज वृत्तसेवा ):-जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या वतीने महात्मा फुले विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय दाढ बुद्रुक येथे झहलेल्या व्हाॅलीबाॅल स्पर्धेत १७ व १९ वर्षे वयोगट शालेय जिल्हा स्तर स्पर्धेत विद्यालयाच्या १७ वर्षे मुले व मुली आणि १९ वर्षे मुले संघांनी प्रथम क्रमांक पटकावला तर १९ वर्षे मुली संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत २५ संघांनी सहभाग घेतला.
विद्यालयाच्या तीन संघांची पुणे विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली मुलींमध्ये ममता गुळवे,समृद्धी तांबे,ऋषाली पाळंदे, नयन बर्डे,साक्षी बोटे, तन्वी वाडेकर, नवेली दिवे मुलांमध्ये – ओंकार पवार,साई साळवे,सुमित साळवे,निखिल जाधव,यश थेटे, कृष्णा लकारे, ओम गाडेकर, यश दिवे, रोहित तांबे ,महेश साळवे,निखिल कदम आदींनी उत्कृष्ठ खेळ केला. सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक दादासाहेब तुपे आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र कोबरणे, सर्व शिक्षक-शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.
पुणे विभागीय स्पर्धेकरिता खेळांडूचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, शिक्षण समन्वयक नंदकिशोर दळे, क्रिडा संचालक डॉ. प्रमोद विखे तसेच स्कूल कमिटी उपाध्यक्ष व सदस्य, प्राचार्य डॉ. राजेंद्र कोबरणे, सर्व सेवकवृंद, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.



