लोणी दि. २७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर अंतर्गत सन २००९ पासुन 90.8 MHz केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडीओ कार्यरत आहे. रेडीओच्या माध्यमातुन विविध प्रकारचे कार्यक्रम निर्मिती आणि प्रसारण करण्यात येते. याचाच एक भाग म्हणुन स्त्री पुरुष समानता या विषयावर हिंसा को नो या प्रकल्पांतर्गत जागर स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातुन नवदुर्गा आपल्या भेटीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याला श्रोत्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्ञज्ञ शैलेश देशमुख, रेडीओचे समन्वयक कैलास लोंढे,कार्यक्रम अधिकारी सौ. गायञी म्हस्के आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची घटस्थापनेच्या दिवसापासुन सुरु करण्यात आली. यामध्ये नवव्या माळेपर्यंत रोज विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. . यामध्ये सौ. वंदना आडसुळ, दिपा आहेर, ब्रम्हकुमारी आशा दिदी, डॉ. सुधा कांकरीया, डॉ. दिप्ती भंडारी, डॉ. पडघन, डॉ. स्वाती म्हस्के, डॉ. वैशाली न्हरके, कांताबाई आहेर, आशाताई दंडवते यांनी सहभाग नोंदवीला.कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य,आहार,विविध समस्या,महिला सक्षमीकरण,नारी शक्तीचा जागर करण्यात आला.
केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडीओच्या माध्यमातून कृषि,शिक्षण,आरोग्य,ग्रामीण विकास,सांस्कृतिक कार्यक्रम हे लोकाभिमुख ठरत आहेत.केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध उपक्रमाची माहिती ही रेडीओच्या माध्यमातून जनजागृती केली जाते.थेट प्रसारीत होणा-या कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचे मंथन होत असल्याने श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेडीओ प्रतिनिधी संगिता मोरे, जालीदर म्हसे यांनी विशेष प्रयत्न केले.




Total Users : 631711