राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- मराठा समाज बांधवांची बैठक विठ्ठला लॉन्स येथे शनिवारी संपन्न झाली.यावेळी राहुरी तालुक्यातील शेकडो तरुण उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या ४० वर्षांपासून आंदोलने होत आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.परंतु कोणत्याच सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही.जगात नोंद व्हावे असे लाखोंचे मोर्चे या महाराष्ट्रात झालेत.परंतु आरक्षण मिळालेले नाही.
मराठा संघर्ष योद्ध मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी जि.जालना येथे आमरण उपोषणास सुरवात केलेली आहे.त्यांच्या उपोषणास पाठींबा म्हणून राहुरी तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने राहुरी तहसिल कार्यालया समोर सोमवार दि.३० ऑक्टोंबर २०२३ पासून सकाळी ११ ते दु.४ वाजेपर्यंत साखळी उपोषण करण्याचे नियोजन करण्याचे मराठा समाज बैठकीत ठरले आहे.
या साखळी उपोषणात राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावाला एक दिवस देण्यात येणार आहे.दि.३० पासून सुरु होणाऱ्या साखळी उपोषणास राहुरी तालुक्यातील मराठा बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाज,मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती राहुरी तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.




Total Users : 631603