spot_img
spot_img

पंतप्रधान मोदी यांचे हस्ते दगडु भागवत यांचा सन्मान

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील शेतकरी दगडू भागवत गिते यांना स्वामित्व योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सनद प्रदान करण्यात आल्याने चिंचविहिरे परिसरातून आनंद व्यक्त होत आहे. 

शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात हि प्रातिनिधीक स्वरूपात सनद प्रदान करण्यात आली.

चिंचविहिरे सारख्या लहानशा गावातील एका शेतकरी कुटुंबातील सर्व सामन्य माणसाला हा सन्मान मिळाला हे भाग्य मला लाभले आहे. यामुळे आता गावठाणात राहणार्‍या प्रत्येकाला स्वत: राहत असलेल्या जागेचे स्वामित्व मिळणार आहे. हे फक्त राज्यातील महायुती सरकारमुळे शक्य झाले आहे.

यासाठी राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील व माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या दुरदृष्टिकोनातून शक्य झाले आहे, असे दगडू गिते यांनी सांगीतले. कार्यक्रमास चिंचविहिरे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!