एकरूखे (जनता आवाज वृत्तसेवा ):- मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे सहावा दिवस उजाडुन देखिल सरकारने यावर निर्णय न घेतल्याने सकल मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज सोमवार रोजी राहाता तालुक्यातील अनेक गावांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने राहाता तालुका बंदची हाक दिली होती.
व्यापाऱ्यांनी आपली दुकाने व्यवहार बंद ठेवून या प्रश्नाला पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देत राहाता शहरासह अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळून आपला पाठिंबा दर्शिवित आहेत राहाता तालुक्यातील एकरुखे गणेशनगर चितळी रामपुरवाडी या गावांमध्ये देखिल कडकडीत बंद पाळण्यात आला आहे तर एकरुखे येथे आज राञी आठ वाजता जरांगे पाटलांना पांठिबा दर्शवित त्यांच्या आंदोलनला साथ देत पुढिल नियोजना करिता मारुती मंदिराच्या प्रांगणात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.



