spot_img
spot_img

सेल्‍फी विथ ‘मेरी माटी मेरा देश’ विश्वविक्रमासाठी शिर्डी मतदारसंघातून एक लाख सेल्फीची नोंद

लोणी दि. ३१,( जनता आवाज वृत्तसेवा ):-शिर्डी विधानसभा मतदार संघातून सेल्‍फी विथ ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमात सुमारे एक लाख विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेवून आपल्‍या सेल्‍फीची नोंद केली आहे. या उपक्रमातील सेल्‍फींच्‍या विश्‍वविक्रमाची नोंद होण्‍यासाठी मतदार संघातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी या अभियानाला स्‍वयंस्‍फुर्तीने प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या शिर्डी येथील दौ-याप्रसंगी मेरी माटी मेरा देश या अभियानातील अमृत कलश महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रधानमंत्र्यांकडे सुपूर्त केला.

स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभर ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम राबविण्‍याच्‍या केलेल्‍या आवाहनाला प्रतिसाद म्‍हणून शिर्डी विधानसभा मतदार संघात महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली मागील दोन महिने ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविण्‍यात आले प्रत्‍येक गावात यासाठी विविध कार्यक्रमांचे करण्‍यात आले होते. यासाठी एक रथही तयार करण्‍यात आला होता.

प्रामुख्‍याने मतदार संघातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये रथ पाठवून या अभि‍यानात सर्व विद्यार्थ्‍यांचा सहभाग उस्‍फुर्तपणे नोंदविण्‍यात आला. सेल्‍फी विथ ‘मेरी माटी मेरा दे’ हे अभियान यासाठी सुरु करण्‍यात आले होते. विद्यार्थी आणि त्‍यांच्‍या पालकांसहीत सर्व सेल्‍फींची सुमारे १ लाखांची नोंद झाली आहे. या सेल्‍फींच्‍या होणा-या विश्वविक्रमात शिर्डी मतदार संघाचेही योगदान लक्षवेधी ठरणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!