spot_img
spot_img

भंडारदरा धरणातून रविवार पासून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू करा पालकमंत्री विखे पाटील यांच्या सूचना

लोणी दि.४( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा धरण समूहातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन रविवार पासून सुरू करण्याच्या सूचना महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.

लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची होत असलेली मागणी लक्षात घेवून सात दिवसांचे आवर्तन सोडण्याबाबात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवर्तनाचे नियोजन रविवार दि.५नोव्हेंबर पासूनच करण्याच्या सूचना दिल्या.या आवर्तनामुळे अकोले संगमनेर राहाता श्रीरामपूर आणि नेवासा या लाभक्षेत्रातील तालुक्यांना मोठा दिलासा मिळेल.

यापुर्वी जलसंपदा विभागाने १ ऑगस्ट २०२३ ते ८ ऑगस्ट  २०२३ पर्यत पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले होते.पावसा अभावी शेती पीकांना दिलासा देण्यासाठी ९ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर पर्यत शेतीच्या पाण्याच्या आवर्तानाचे नियोजन जलसंपदा विभागाने केले होते.

यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी राहीलयाने उपलब्ध पाणी साठ्यानूसारच आवर्तनाचे नियोजन करण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या सूचनेनंतर भंडरादारा धरणातून रविवारी सकाळी आवर्तन सोडण्याचे नियोजन विभागाने सुरू केले असल्याने अभियंता काळे यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!