राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यामध्ये अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या साकुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने दीपावलीनिमित्त सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले. मागील आर्थिक वर्षात सोसायटीला चांगला नफा झाल्यामुळे सोसायटीने सभासदांकरिता नऊ टक्के इतका लाभांश वाटप केला आहे.
आज साकुरी येथील साकुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयामध्ये सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले यावेळी अनंत दंडवते जयराज दंडवते ,तुकाराम बावके,सुदाम बनसोडे,रंगनाथ दंडवते, साकुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री अशोक रामभाऊ बावके, त्याचप्रमाणे जयराज दंडवते ,सुधाकर दंडवते भास्कर रेवगडे, भाऊसाहेब शिंदे आदी उपस्थित होते



