spot_img
spot_img

जायकवाडीला नाशिकच्या धरणातुन पाणी सोडण्यात येवु नये असे निवेदन डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेटुन दिले.

राहाता (जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता तालुक्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतक-यांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असुन गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांचे सर्वाधिक नुकसान होणार असल्याने जायकवाडीला नाशिकच्या धरणातुन पाणी सोडण्यात येवु नये असे निवेदन डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेटुन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने राहाता तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थीती निर्माण झाली असुन शेतात पेरणीनंतर उतरलेले पीक पाण्याआभावी जळताना पाहुन शेतकरी हताश झाला आहे. तालुक्यात प्रथमच पावसाचा निच्चांक झालेला असुन विहीर व कुपनलिकांचे पाणी शेवटच्या घटका मोजत आहे. या दुष्काळी स्थितीवर डोळेझाक करता येणार नाही. गणेश परिसरात ज्या शेतक-यांच्या फळबागा आहेत कींवा ज्यांची पिके अजुनही पाण्यावर आहेत अशांना जीवनदान देण्यासाठी तातडीने गोदावरी कालव्यांचे आवर्तन सोडणे गरजेचे आहे यामुळे किमान शेतक-यांना दिलासा तरी मिळेल. पाउस न पडल्याने कर्ज काढुन शेतक-यांनी पेरण्या, मशागती तसेच पिकासाठी वापरण्यात येणारे विविध रासायनिक खते इत्यादीचा वापर केला. परंतु ऐन वेळी पावसाने पाठ फिरवल्याने डोळ्यासमोर उभी राहिलेली पीके अक्षरश: जळताना शेतक-याला पहावे लागले. यंदाच्या वेळी कमी पाऊस झाल्याने शेततळे जलसंधारणातुन झालेल्या साठवण तलावातही पाण्याचा संचय झाला नाही. गेल्या 8-10 वर्षापासुन शेतीतुन मिळणारी समृद्धीच पाण्या अबावी जणु गायब झाली आहे. तसेच फक्त शेतीवरच उदरनिर्वाह असलेल्या कुटुंबाची अतिशय बिकट अवस्था झाली आहे.

गोदावरी नदीतून यंदा दुष्काळ असताना देखील २१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे गेले, तरीही दारणा व गंगापूर धरण समूहातून तब्बल तीन टीएमसी पाणी जायकवाडीत सोडले जाणार असल्याचे समजते. दारणा व गंगापूर धरण समूहाला त्याचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे या समूहातील शेती आणखी धोक्यात येईल. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रावर त्यामुळे अन्याय होतो. नाशिकमधील धरणातून पाणी सोडणे चुकीचे होईल.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!