लोणी दि.६( जनता आवाज वृत्तसेवा ):-शालेय जीवनात शिक्षकांकडून मिळणाऱ्या ज्ञानाबरोबरच विविध क्रीडा क्षेत्रातून मिळणारा नावलौकिक विद्यार्थ्यांच्या,पालकांच्या आत्मविश्वासात नक्कीच भर घालण्याचे काम करतो ते काम विखे पाटील सैनिक विद्यालयाचे कमांडट, शिक्षक करताना दिसतात .विद्यालयाच्या स्थापनेपासून विद्यालय दरवर्षी विविध कलागुणातून तसेच एन डी ए सारख्या परीक्षा मधून आपला दर्जा उंचावत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोणीच्या पद्यश्री विखे पाटील सैनिक विद्यालयाच्या २६ व्या वार्षिक स्नेहसंमेलप्रसंगी काढले याप्रसंगी सौ.विखे पाटील बोलत होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांमधून दाखविलेले साहस अश्व रोहन, धनुर्विद्या डोळ्यांचे पारणे फेड णारे ठरले .तसेच यावर्षीची संकल्पना महाराष्ट्राचे दुर्ग वैभव गाथा यावर सांस्कृतिक विभागाने प्रत्यक्ष इतिहास साकार केला.नुकतेच भारतीय सैन्यदल अधिकारी निवड प्रक्रियेची एन डी ए परीक्षेत विद्यालयाचा माजी विद्यार्थी कॅडेट युवराज भोसले याने देश पातळीवर ७२ वा क्रमांक मिळवून प्रवेश मिळवला बद्दल कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कॅडेट युवराज याने
मला जीवनात संयम आणि सकारात्मक विचाराने हे यश प्राप्त करून दिले विद्यार्थी दशेतील शाळेने लावलेली शिस्त हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली ठरली असे प्रतिपादन केले याप्रसंगी विद्यालयाचे पहिले कमांडट कर्नल डी एच परब , सौ गिता परब, संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ सुष्मिता विखे पाटील, शिक्षण संचालिका सौ एल बी सरोदे, प्राचार्या भारती कुमकर, प्राचार्या रोजमीन बेलीन,प्राचार्य एस के मोरे आदी मान्यवर व विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी पालक उपस्थित होते. कर्नल डी एच परब यांनी आयुष्यात जिद्द चिकाटी बरोबरच मैत्री आणि टीम वर्क महत्त्वाचे असते यातून विचारांचे आदान प्रदान व्यक्त होताना मनमोकळेपणातून ज्ञानात वाढ होते आणि टप्प्याटप्प्याने होणारा बदल दीर्घकाळ टिकून यश संपादन करण्यास सहाय्यभूत ठरतो असा विचार व्यक्त केला.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक विद्यालयाचे कमांडंट शेखर जोशी यांनी तर अहवाल वाचन प्राचार्य भरत गाढवे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्राध्यापक राजेश माघाडे यांनी व्यक्त केले.



