spot_img
spot_img

कृषी उत्पन्न बाजार समिती टाकळीभान उपबाजार आवाराच्या २५ लाखांच्या ठेवी ; संचालक मयुर पटारे आणि विद्याताई दाभाडे यांची माहिती.

टाकळीभान (जनता आवाज वृत्तसेवा ):-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवाराच्या वतीने २५ लाख रुपयांच्या ठेवी जिल्हा सहकारी बँकेत करण्यात आलेल्या आहेत. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवाराची स्थापना १० ऑक्टोबर १९८६ ला झाली होती. येथील बाजार समितीचे माजी संचालक ॲड. विठ्ठलराव पटारे यांच्या पुढाकाराने तसेच माजी सरपंच बंडुतात्या पटारे यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात १९९० ला याठिकाणी उपबाजार आवारासाठी तीन एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. उपबाजारच्या इतिहासात पहिल्यांदाच ठेवी करण्यात आलेल्या आहेत.

यावेळी माहिती देताना संचालक मयुर पटारे म्हणाले की लोकनेते आदरणीय श्री. भानुदासजी मुरकुटे साहेब आणि युवा नेते उपनगराध्यक्ष श्री. करणदादा ससाणे, युवा नेते श्री. सिध्दार्थजी मुरकुटे आणि माजी सभापती श्री. सचिनदादा गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बाजार समितीचे सभापती श्री. सुधीरअप्पा नवले यांच्या नेतृत्वात आणि सर्व संचालक मंडळ आणि सचिव साहेबराव वाबळे यांच्या सहकार्याने उपबाजार अवराचे कामकाज अतिशय काटकसरीने सुरू आहे. यात उपबाजार आवारातील शाखाधिकारी व कर्मचारी यांचा देखील सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. यापुढे देखील असेच कामकाज सुरू ठेवत स्व. भाऊसाहेबअण्णा दाभाडे यांच्या संकल्पनेतून लवकरच बाजार समितीचा पेट्रोल पंप टाकळीभान येथे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बाजार समितीचे संचालक खंडेराव सदाफळ, किशोर बनसोडे, राजू चक्रनारायण, संत सावताचे संचालक विलास दाभाडे, शिवाजीराव पटारे, गणेश गायकवाड, शाखा व्यवस्थापक दिनकर पवार, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी पराग ढुमणे, वैभव रणनवरे, हर्षद दाभाडे आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!