लोणी दि.१३( जनता आवाज वृत्तसेवा ):- पुणे ( बालेवाडी) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणीच्या मुली शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत कांस्यपदकांच्या मानकरी ठरल्या. राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत प्रवरा कन्या विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज लोणी येथील १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने ४x१०० मीटर फ्रीस्टाइल रिले स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळविले. सदर स्पर्धेमध्ये कु. सेजल लष्करे, कु. सुप्रिया आपसुंदे , कु.साक्षी खतेले आणि कु.शौर्या जगताप या विद्यार्थ्यीनीं सहभागी झाल्या होत्या. त्यांना विद्यालयाच्या स्विमिंग कोच सुचित्रा तांबे, क्रीडा शिक्षिका सौ विद्या घोरपडे ,सौ कल्पना कडू यांचे मार्गदर्शन लाभले.
यशाबद्दल संस्थेच अध्यक्ष आणि महसूल मंत्री व अहमदनगर ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ,अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे , शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे , क्रिडा संचालक डाॅ.प्रमोद विखे, प्रवरा कन्या मंदिरच्या प्राचार्या सौ भारती कुमकर , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ सीमा बढे , पर्यवेक्षक बी पी चिंधे , ज्युनिअर कॉलेजचे इनचार्ज प्रा नंदू कुदळे, प्रा. आर.बी.दिघे , ज्येष्ठ शिक्षक अनिल लोखंडे , सौ मोहिनी गायके , आर एम लबडे, श्री सुरेश गोडगे आदींनी अभिनंदन केले आहे.



