नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासा तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रथमच महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून माजी सरपंच एडवोकेट संदीप कापसे पाटील यांच्या पत्नी सौ. सुजाता संदीप कापसे पाटील भरघोस मतांनी विजयी झाल्या. सरपंच पदासाठी तीन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केलेली होती विरोधी सरपंच पदाचे उमेदवार सौ. संध्या प्रसाद काळे व सौ.अरुणा सुभाष काळे यांचा दारुण पराभव झाला.
तसेच उपसरपंच निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाने सर्व नामनिर्देशन पत्रे काढून घेतल्याने उपसरपंच म्हणून सौ अंजना संजय आढागळे यांची बिनविरोध निवड सरपंच यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आली. तर सदस्य म्हणून सौ मंगल कापसे, सौ आशाबाई कापसे, आणि दीपक चक्रनारायण हे निवडून आले.सरपंच व उपसरपंच निवडणुकीसाठी गावातील ज्येष्ठ मंडळींनी तसेच तरुण मंडळींनी ग्रामपंचायत निवडणूक निर्विवाद पार पडली.



