spot_img
spot_img

तणनाशकांचा वापर करतांना काळजी घ्या – शैलेश देशमुख कृषि विज्ञान केंद्र,बाभळेश्वर येथे जनजागृती

लोणी दि.२५( जनता आवाज वृत्तसेवा ):-तणनाशकांचा वापर करतांना शेतक-यानी जागृत होण्याची गरज आहे. ग्लायफोसेट या तणनाशकांच्या बाबतीत आधिक जागृत राहावे, याबाबतचे अधिक ज्ञान घेऊन शेतकऱ्यांनी यांचा वापर करावा केवळ उघड्या जमीनीवरच परवानाधारक आणि योग्य ती काळजी घेऊन वापर करा असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले.

बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या ग्लायफोसेटची सुरक्षित हाताळणी आणि वापर याविषयी फवारणी व्यावसांयिकांसाठी आयोजित ए‌कदिवसीय प्रशिक्षणात शैलेश देशमुख बोलत होते. यावेळी केंद्रातील शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे, भरत दंवगे डॉ.विलास घुले,डाॅ. विठ्ठल विखे, प्रियंका खर्डे, सज्जला लांडगे, कैलास लोंढे यांच्यासह फवारणी व्यावसायिक आणि शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पिक संरक्षण विभागाचे प्रमुख भरत दंवगे यांनी तणनाशकांचा वापर, प्रमाण, आणि फवारणी करतांना काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहीती दिली. कार्यक्रमात यावेळी शांताराम सोनवणे, डॉ. विलास घुले यांनीही वेगवेगळ्या पिकांतील तणनियंञणाची माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रियंका खर्डे यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!