संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील निमज गावात डीजेवर बंदी घालण्यासाठी गावातील संत प्त झालेल्या महिलांनी ग्रामसभेत प्रश्नउप स्थित केला महिलांनी केलेल्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून ग्रामपंचायत प्रशासनाने गावामध्ये डी जे बंदीचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला त्या मुळे आता या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने पारंपारिक वाद्याला सुगीचे दिवस येणार आहे
लग्न समारंभ वराती वाढदिवसविजयी मिरवणुका यात्राउत्सव यासारख्या सर्वच कार्यक्रमांमध्ये सर्वत्र डीजेचा दणदणाट ऐकायला येत असतो डीजेच्या डेसिबल वर पोलीस प्रशासनाने मर्यादा घालूनदिले असतानाही ते नियम पायदळी तुडवत सर्वात जास्त आवाजाचे डेसिबल वाज विले जात असते मात्र डीजेच्या कर्णकश आवाजामुळे गावातील वयोवृद्ध व लहान मुलांना त्रास होत आहे या डीजेच्या आवा जामुळे ज्येष्ठांना तसेच लहान मुलांना हृदय विकाराचा त्रास जाणवू लागला त्या मुळे संपूर्ण निमज गावातून डीजेला हद्द पार करण्यासाठी गावातील महिला पुढे सरसावल्या
निमज गावात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये गावातील शंभर ते दीडशे महिलांनी ग्रामसभेस उप स्थित राहून गावात डीजेंच्या आवाजामुळे घरातील ज्येष्ठांना व लहान मुलांना खूप त्रास होत आहे त्यामुळे गावात होणाऱ्या विविध कार्यक्रमातील डीजेवर कायम स्व रूपीची बंदी घालावी अशी मागणी गावा तील आक्रमक झालेल्या महिलांनी ग्राम सभेमध्ये करत ग्रामपंचायत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले त्यानंतर या महिलां च्या मागणीचा ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून गावातील कुठ ल्याही कार्यक्रमाला डीजे वापरायचा नाही गावात संपूर्णपणे डीजे बंदी करण्याचा ठराव करण्यात आला परंतु जर लग्नसरा ईच्या काळात किंवा विविध सण उत्सवा च्या काळात गावामध्ये डीजे वाजला तर आम्ही सर्व महिला एकत्र येऊन उग्र स्वरू पाचे आंदोलन छेडू असा इशारागावातील महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे



