spot_img
spot_img

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या… शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना भाजपा, विविध पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्त्याचें निवेदन ! कारवाई झाली नाही तर आठ दिवसात आंदोलनाचा इशारा !

शेवगाव( जनता आवाज वृत्तसेवा )अहमदनगर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे व त्यांचे बंधू उदय मुंढे यांच्यावर भादवि कलम ३७९/३४ अन्वये शेवगाव पोलीस ठाण्यात शुक्रवार दि २४ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले. हे वाळू चे खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्या तसेच ही खोटी पोलीस केस दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा ! या मागणीसाठी आज शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयावर भाजपा पदाधिकारी व अन्य पक्षांच्या पदाधिकार्यांनी एकत्र येऊन शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांना निवेदन दिले.

खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ बदलीची करण्यात यावी व त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी निवेदनकर्त्यांनी पाटील यांच्याकडे केली.

यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ भाऊ दौंड, पाथर्डी चे माजी सभापती संभाजीराव पालवे, पाथर्डी चे भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, धनंजय बडे, प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर, अमोल सागडे, संजय कीर्तने, गुरुनाथ माळवदे बाळासाहेब कोळगे, संजू मरकड, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौशल सदस्य संजय नांगरे, राष्ट्रपती शेवगाव तालुका अध्यक्ष आत्माराम कुंडकर, आर पी आय चे अध्यक्ष सतीश मगर, डॉ कृष्णा कुमार देहाडराय, डॉ नीरज लांडे, विनोद मोहिते, संजय टाकळकर, छबू मंडलिक बाळासाहेब आव्हाड, अशोक गाडे, संजय खेडकर, गणेश कराड, अर्जुन ढाकणे, वजीर पठाण, युसुफ शेख, अजय भारस्कर, भूषण देशमुख, राहुल भारस्कर, अॅड श्याम कनगरे, संजू मोहिते लाडजळगाव चे अंबादास ढाकणे, युवराज फुंदे, अमोल फुंदे, पप्पू केदार, सर्जेराव जवरे, अशोक जवरे, अण्णासाहेब ढोक, शिवाजी दहिफळे, मल्हारी घुले, माऊली उगले, रवि राशिनकर, अभिजीत घोळवे, तुकाराम थोरवे, तसेच शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शेवगाव पोलीस निरीक्षकाच्या विरोधात घोषणाबाजी

शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्या कार्यालयाला निवेदन देते वेळी कार्यकर्त्यांनी शेवगाव पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली.

पोलीस तक्रार व बांधकाम विभाग यांच्या पंचनाम्यात मतभिन्नता !

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २३ ऑगस्ट २०२३ रोजी व २४ ऑगस्ट २०२३ रोजीच्या दरम्यान वाळू चोरी गेल्या बाबत नमूद केले आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाने दि २९ ऑगस्ट २०२३ रोजी प्रत्यक्षात पंचनामा केला असता वाळूचा साठा जशास तसा आहे हे स्पष्ट होते. यावरून सदरची तक्रार ही खोटी व राजकीय नेतृत्वाच्या संगत मताने केलेली आहे हे स्पष्ट होते. असे निवेदनात म्हटले आहे.

खोटी पोलीस केस दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास रास्ता रोको चा इशारा !

शेवगाव पोलीस निरीक्षक यांच्यावर आठ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर रस्ता रोको व उपोषणाचा इशारा आजच्या निवेदनात देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!