लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनऔषधी विभागांतर्गत व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये प्रवरानगर येथे शालेय वनऔषधी उद्यानाची उभारणी करण्यात आली. शुक्रवार दि.१ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विश्वस्त सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते या हर्बल गार्डनचा औपचारिक उद्घाटन समारंभ पार पडला.
आजपासून ही वनऔषधी वनस्पती बाग सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहे.उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी करून दिला.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतीचे संगोपन व संवर्धनाचे महत्त्व विशद केले व प्राचीन काळातील आजीबाईच्या बटव्याचे महत्व ही सांगितले. प्राचीन वनऔषधी व आयुर्वेद ही काळाची गरज बनली आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
या उद्घाटनप्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन व स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. भास्करराव खर्डे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष श्री.मच्छिंद्र थेटे, श्री दादासाहेब घोगरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संदीपजी खर्डे,श्री.भाऊसाहेब चेचरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वनऔषधीचे उपयोग व महत्त्व समजावे यासाठी शासनाने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमास प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक डाॅ. पी.एम दिघे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. उपक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ.अनिल वाबळे हे काम पाहत आहे.
याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. भारत पाटील घोगरे,अतिरिक्त सी ई ओ श्री. हिरेमठ,माध्यमिक शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे,समन्वयक श्री.नंदकुमार दळे हे ही उपस्थित होते.
प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये हर्बल गार्डनच्या उभारणीत शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे, उपप्राचार्य श्री. के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम एस जगधने,सौ.रत्नपारखी,श्री.व्ही के शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री.के टी अडसूळ यांनी केले व सूत्रसंचालन सौ. प्रतिभा घोलप व विद्यार्थिनी कु.अक्षरा गडाख यांनी केले.