नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- मरावे परी कीर्तीरुपी उरावे या उक्तीप्रमाणे ह भ प बद्रीनाथ काळे यांचे अचानक ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.या अचानक आलेल्या संकटाने काळे कुटुंब पुरते हेलावले.मा खा यशवंतराव गडाख व आ शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक,अध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे अनेकांना मदतीचा हात देणारे स्व बद्रीनाथ काळे यांच्या समाज उपयोगी कामाचा वसा वारसा जपला जावा या हेतूने वाणीभूषण ह भ प उद्धव महाराज मंडलिक नेवासकर यांच्या मार्गदर्शनाखाली नदीचे व पाण्याचे होणारे प्रदूषण टाळून स्व काळे यांच्या रक्षा नदीपात्रात विसर्जित न करता वाकडी ता नेवासा येथे रक्षा शेतातच विसर्जित करून त्यामध्ये आंबा वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी स्व काळे यांचे मुले सचिन राहुल,प्राचार्य डॉ गोरक्षनाथ कल्हापुरे,प्रा सुरेश काळे,आप्पासाहेब महाराज निमसे,प्रकाश गडाख,आदींसह काळे कुटूंबातील सदस्य, ग्रामस्थ नातेवाईक उपस्थित होते.
शेतात रक्षा विसर्जन करून वृक्षारोपण करून स्व बद्रीनाथ काळे यांच्या स्मृती जपणारा उपक्रम काळे कुटुंबाने डोंगरा एवढे दुःख बाजूला सारून केला
.(ह भ प उद्धव महाराज मंडलिक नेवासकर)