टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील कोकणे वस्ती, दत्त मळा येथे असलेल्या स्वयंभू श्री. दत्त मंदिरात श्री. दत्त जयंती उत्सव व कलशारोहन सोहळा मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दत्तजयंती निमित्त सकाळी ६ वाजता श्री. दत्तात्रयांना गंगाजलाने स्नान व अभिषेक, दत्तात्रयांच्या मूर्तीची विधीवत पूजा, १० वाजता ह. भ. प. रविंद्र महाराज गांगुर्डे यांनी केलेल्या गुरू चरित्र पारायणाची समाप्ती, दुपारी १२ वाजता आरती, दुपारी१२.३० ते २.३० या दरम्यान श्री. दत्तात्रय मूर्तीची व कलशाची भव्य मिरवणूक, दुपारी ३ वाजता घोगरगाव येथील बालब्रम्हचारी महंत विश्वनाथगिरी महाराज यांचे हस्ते कलशारोहन सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर विश्वनाथगिरी महाराज यांचे प्रवचन व नंतर ५.३०वाजता श्री. दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. श्री. दत्त जन्मानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
श्री. दत्त जयंती उत्सव व कलशारोहन सोहळ्यास ग्रामस्थांनी, भाविकांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन मंदिराचे पुरोहित विजय देवळालकर व कोकणे बंधू यांनी केले आहे.