या शिबिरासाठी कृष्णा डायग्नोस्टिक यांच्यातर्फे मार्गदर्शक म्हणून श्री रवी वेल्लूर सर श्री सागर भवर सर श्री गणेश भिसे यांच्या मार्गदर्शन लाभले. यामध्ये काही विद्यार्थ्यांची प्रशिक्षणार्थी व काही विद्यार्थ्यांना मानधन तत्वावर यांच्यामार्फत ऑफरलेटर(नियुक्तीपत्र) देण्यात आले. यामध्ये एकूण परीक्षा पूर्व 23 विद्यार्थी व विद्यार्थिनींचा रेडिओलॉजी या विभागात विद्यार्थ्यांना 5000 मानधन नियुक्त मिळाल्या तसेच DMLT या कोर्स मधील परीक्षा पूर्व एकूण 18 विद्यार्थ्यांना 22000 इतक्या मानधनावर नियुक्त देण्यात आल्या.
श्री साई निर्माण पॅरामेडिकलच्या 23 विद्यार्थ्यांना नोकऱ्या
शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा ):-पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या श्री साई निर्माण पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट येथे कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्यामार्फत कॅम्पस इंटरव्यू व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व कामाकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून माननीय श्री गणेश डांगे सर माननीय श्री संदीप डांगे सर तसेच श्री साई निर्माण पॅरामेडिकलचे संस्थापक माननीय श्री पंकज कांबळे सर प्राचार्य सौ भारती पंकज कांबळे अध्यापिका सौ सीमा पवार मॅडम अध्यापिका सौ रावल मॅडम संचालक कुमार प्रीतम कांबळे पूनम कांबळे तसेच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन चार्ज म्हणून कुमारी कोमल सांबारे यांनी इंटरव्यू व मार्गदर्शन शिबिर पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच माननीय श्री विजुभाऊ कोते पाटील व माननीय श्री ताराचंद कोते पाटील यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.



