spot_img
spot_img

परिपुर्ण अभियंता घडविने हेच प्रवरेचे ध्येय – डाॅ.विजय राठी

लोणी दि.२( प्रतिनिधी):-परिपुर्ण अभियंता घडविने हे पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकचे ध्येय राहीले आहे. पायाभूत सुविधा व दर्जेदार शिक्षण हे आमचे वैशिष्ट्य आहे. जागतिक स्पर्धा आणि खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रवरेतील विद्यार्थी नेहमी अग्रेसर राहण्यासाठी लोकनेते खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी सुसज्ज व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम सुरू असल्याने प्रवरेचे विद्यार्थी देशात तसेच परदेशात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी केले.

पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मेकॅट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र निंबाळकर, संगणक विभाग प्रमुख प्रा. रवींद्र काकडे, प्रा. ई. आर. घोगरे, प्रा. विजयश्री वैद्य, प्रा. सागर शेळके, प्रा. सागर वाल्हेकर, प्रा. मंदाकिनी ढवळे, प्रा. पी.आर गव्हाणे, प्रा. एस.एन. सातभाई, प्रा. प्रशांत जेजूरकर, प्रा. रजत शेळके उपस्थित होते.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्तिक शेळके याने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रवरेत अतिशय आनंदी वातावरणात शिक्षण घेता आले. अभ्यासा व्यतिरिक्त कंपन्यामधील नविन तंत्रज्ञान व सर्वांगिणविकासासाठी विविध उपक्रम राबविल्यामुळे आत्मविश्वास निर्माण होत असल्याने कंपन्यामध्ये नोकरी मिळणे सोपे होत असल्याचे सांगितले.
यावेळी कृष्णा थोरात, ज्ञानेश्वरी तळवले व सौरभ बरे या विद्यार्थ्यांनी सुत्रसंचालन केले. आदर्श विद्यार्थी म्हणून कार्तिक शेळके या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!