लोणी दि.२ (प्रतिनिधी):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या
सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालय चिंचोली येथील अंतिम वर्षाच्या मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन, केमीकल्स या विभागातील विद्यार्थ्यांची एपिटोम कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर येथे ५६ विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. अशी माहिती प्राचार्य डॉ. जी. बी. शिंदे यांनी दिली.
गुणवत्ता पुर्ण शिक्षणासोबत नोकरी यांवर प्रवरेचा कायमच भर राहीला आहे.औद्योगिक क्षेञाला कुशल मनुष्यबळ मिळावे म्हणून अभ्यासक्रमाबरोबरचं विविध कंपन्याना भेटी,मार्गदर्शन मेळावा,करीअर मार्गदर्शन विविध चरार आणि माजी विद्यार्थ्याचे वेळोवेळी मार्गबर्शन यामुळे प्रवरेतील विद्यार्थी अनेक ठिकाणी प्लेंसमेट होत आहे यार्षी जवळपास सर्वच विद्यार्थ्यीची नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली आहे विद्यार्थ्यांच्या या यशा पाठीमागे प्राचार्य डॉ. जी बी शिंदे , प्रा दीपक चद्रे, प्रा. विजय कडलग, प्रा. अर्चना हटकर, प्राध्यापक नदीम शेख यांच्या मोलाचा वाटा राहिला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, खा. डॉ. सुजय विखे पा., सह सचिव भारत घोगरे,चिंचोली कॅम्पच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,अतांञिकचे संचालक डाॅ. प्रदीप दिघे,शिक्षण संटालिका सौ.लिवावती सरोदे आदींनी अभिनंदन केले.



