मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):-गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला.
आज खा. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी असलेली निष्ठा कायम ठेवत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितां सर्व खासदारांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



