नगर( जनता आवाज वृत्तसेवा):- समाज सेवा हीच ईश्वर सेवा आहे आपण आपले काम प्रामाणिकपणे केले तर राष्ट्राचा विकास होण्यास मदत होईल जीवनात शिस्त व स्वावलंबनाचे महत्त्व सांगत शिबिरातील संस्कार जीवनभरासाठी उपयोगी पडतात असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विश्वस्त अँड.दीपलक्ष्मी म्हसे यांनी व्यक्त केले.
न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज,अहमदनगर आयोजित व(स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निमगाव घाना याठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर पार पडले शिबिराच्या समारोपप्रसंगी अँड.दीपलक्ष्मी म्हसे विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
याप्रसंगी कला शाखचे उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे यांनी शिबीर कालावधीत स्वयंसेवकांनी कापरी नदीवर बांधलेल्या वनराई बंधाऱ्याची सविस्तर माहिती देत त्यांचे महत्त्व सर्वांसमोर मांडले शिबिरात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांच्या कामाचे कौतूक केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी निमगाव घाणा गावात शिबिराच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रण जनजागृती सर्व्हे, ग्रामसफाई, पथनाट्याच्या सादरीकरणाच्या माध्यमातून जनजागृती केली.
तसेच कापरी नदीवरील वनराई बंधारा बांधुन देण्यास सहाय्य केले त्यासोबत गावांमध्ये विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले हे सर्व उपक्रम राबविल्या बद्दल सरपंच दीपाली रुपनर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयसेवकांचे कौतुक केले.
यावेळी उपसरपंच संजय पाटील यांनी शिबिरार्थीच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढत गावाच्या विकासासाठी रा.से.यो शिबिराच्या माध्यमातून मागील तीन वर्षातील केलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला.याप्रसंगी संपत दातीर, ग्रामविकास अधिकारी दरेवाडी, सुरेश रुपनर, बाळासाहेब तळुले,रामदास अडसुरे,भिवा कोकरे, प्रा. डॉ.शरद मगर, डॉ.बाळासाहेब पवार व निमगाव घाणा पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.समारोप समारंभाचे प्रास्ताविक प्रा.गणेश निमसे यांनी, पाहुण्यांचा परिचय करून दिला डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी,आभार प्रदर्शन प्रा. भगवान कुंभार यांनी केले सूत्रसंचालन डॉ.सुनिता मोटे यांनी केले.