मुंबई (प्रतिनिधी):- सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक जागा वाटपाचा अद्याप सुटणे तयार नाही कारण महाविकास आघाडी जागावाटप घोळ हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
महाविकास आघाडीने 2024 च्या लोकसभेची तयारी करण्याची सूचना कार्यकर्त्यांना दिल्या परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, व ठाकरे गट यांच्यामध्ये जागा वाटपाहून घोळ सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ठाकरे गट अद्यापही 18 जागावर ठाम आहे असे सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी आठरा जागांवर दावा केला आहे. दादरा नगर हवेली धरून आमचे 19 खासदार लोकसभेत जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजपला टोला दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊत यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नवीन संसद भवनाचं उद्घाटन हा विषय सर्वोच्च न्यायालयाचा नाही तर हा विषय नैतिकतेचा आहे. भाजपनं आमची भूमिका समजून घ्यायला पाहिजे. हा सविधानाच्या आणि राष्ट्राच्या सन्मानाचा प्रश्न आहे.
निमंत्रण पत्रिकेत उपराष्ट्रपती, राष्ट्रपती यांचं नावच नाही. त्यांना निमंत्रण द्यायला हवं होतं. पण यावर कोणीच बोलत नाही, हा एका पक्षाचा कार्यक्रम नसून, देशाचा कार्यक्रम असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. शिंदे गटावर निशाणा दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. शिंदे गट म्हणजे भाजपानं पाळलेलं कोंबडीचं खुराडं आहे. लोकसभेच्या पाच पक्षा अधिक जागा त्यांच्या वाट्याला येणार नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. लोकसभेचे निवडणूक जशी जवळ येत आहे. महाराष्ट्रातील जनतेची महाविकास आघाडीमध्ये जागेचा गुळ हा लवकरात लवकर मिटून कामाला लागावे. अशी उपेक्षा करत आहे