spot_img
spot_img

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या १७ अभियंत्यांची एल अँड टी डीफेन्स कंपनीत नोकऱ्यांसाठी निवड-श्री अमित कोल्हे संजीवनीच्या प्रयत्नातुन वयाच्या १९ व्या वर्षीच मुलं बनताहेत कुटूंबाचा आधार

कोपरगांव( प्रतिनिधी ): –संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत देशाच्या संरक्षण विभागासाठी जमीन आधारीत शस्त्र प्रणाली, हवाई व तोफखाना प्रणाली, अग्निनियंत्रण प्रणालीसह नौदल शस्त्र प्रक्षेपण प्रणाली, लढाऊ अभियांत्रिकी प्रणाली, दळणवळण, इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या एल अण्ड टी डीफेन्स या नामांकित कंपनीने संजीवनी पाॅलीटेक्निकच्या अंतिम वर्षातील एकुण १७ विध्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे.

मागील अनेक वर्षांपासून संजीवनीच्या प्रयत्नाने सर्व सामान्य कुटूबातील नवोदित पदविका अभियंते वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी कुटुंबाचा आधार बनत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 

  पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की प्रत्येक पालक आपल्या पाल्याला चांगली नोकरी मिळाली पाहीजे, हे स्वप्न डोळ्यात साठवुन काही पालकांच्या बाबतीत आपली आर्थिक हतबलता पाल्यांच्या शैक्षणिक प्रवाहात आडवी येणार नाही याची काळजी घेत, किंबहुना वेळ प्रसंगी कोणतीही तडजोड करीत आपल्या पाल्यांच्या पंखांना बळ देतात. यासाठी आपल्या पाल्यांना संजीवनी मधुन नोकरी मिळणारच या विश्वासाने पालक जाणिव पुर्वक त्यांच्या पाल्यांना संजीवनीमध्ये दाखल करतात. अगदी पहील्या वर्षापासूनच विभाग निहाय विध्यार्थ्यांना उद्योग जगताला अभिप्रेत असलेले ज्ञान दिल्यामुळे आज सर्व गरजु विध्यार्थ्यांना संजीवनी मार्फत नोकऱ्या मिळत आहे.
अलिकडेच एल अँड टी डीफेन्स या कंपनीने निवड केलेल्या विध्यार्थ्यांमध्ये अभिजीत चंद्रकांत टोरपे, अनुराग कुमार गुप्ता, मीता अनिल बागुल, चैतन्य राजाराम खरात, प्रणव बाळासाहेब सोनवणे, ऋषिकेश नानासाहेब गांगुर्डे, साहिल राजाराम धरम, क्रिष्णा सुरेश सोनवणे, विकास कुमार, सुप्रिया राजेंद्र चंदाणे, मंगेश भाग्यनाथ जगताप, मुकूंद गंगाधर दवंगे, ऋतुजा संजय परजणे, प्रतिक रघुनाथ हळनोर, ऋषिकेश अच्युत फोपसे, ऋतुजा मनोज गुंजाळ व स्नेहल संजय शिंदे यांचा समावेश आहे. हे सर्व विध्यार्थी त्यांच्या अंतिम वर्षाच्या निकालानंतर लागलीच सेवेत रूजु होणार आहेत.
विध्यार्थ्यांच्या निवडीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी त्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच श्री अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सर्व गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. गिरीश वट्टमवार, प्रा. प्रविण खटकाळे व प्रा. मोहिनी गुजाळ, आदी उपस्थित होते.
        
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!