नगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- पुण्यानंतर आता नगरमध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. अहमदनगर शहरात कोयता गँगने धुडगूस घातल्याचं समोर आलंय. शहरातील नगर पुणे रोड वरील कायनेटिक चौक येथे रात्रीच्या सुमारास चहाच्या टपऱ्या दिल्या पाडून दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रात्रीच्या वेळी हातात कोयता घेवून टपऱ्या या गुंडांनी पाडल्या आहेत. फक्त दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी धुमाकूळ घातल्याचं समोर आले आहे.
दहशत माजवण्यासाठी गुंडांनी छोट्या टपऱ्या पाडल्या आहेत. यामुळे टपऱ्या मालकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. गुंडांचा दहशतीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, गुंडांनी कोयता घेऊन रोडवर आरडा ओरड करत टपऱ्या पाडल्या. याप्रकरणी नगरमध्ये पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली.
कोतवाली पोलिसांनी काही वेळातच कोयता गॅंगमधील तीन गुंडांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी रात्री पाठलाग करून तीनही गुंडांना पकडलं असल्याचं समोर आलंय. अहमदनगरमध्ये कोयता गँगच्या गुंडांचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. चहाच्या टपऱ्या फोडत रस्त्यावर गुंडांनी धिंगाणा घातला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने समोर आलाय. या घटनेत टपऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यापूर्वीही कोयता गँगची घटना
नगरमध्ये मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दहशत निर्माण करण्यासाठी कोयता गॅंगच्या गुडांनी टपऱ्या पाडल्या होत्या. नगर पुणे महामार्गावरील सुपा गावात ही घटना घडल्याचं समोर आलं होतं. गुंडाच्या हल्ल्यात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा शहरामध्ये कोयता गॅंगच्या गुंडांची दहशत दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसं दहशतीचे वातावरण आहे.



