spot_img
spot_img

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या ४५ मुलांना नोकरीची संधी …

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात मॅक्लाइड फार्मासिटिकल कंपनीच्या वतीने एम. एस्सी आणि बी.एस्सी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीतून ४५ जणांची नोकरीसाठी निवड झाल्याची माहीती संस्थेचे शिक्षण संचालक आणि प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे यांनी दिली.   

कंपनीचे अधिकारी धर्मपाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत करुन निवड चाचणी आणि प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या यामध्ये २१० विद्यार्थ्यामधून ४५ जणांची निवड झााली. नोकरी देण्यासाठी महाविद्यालयामध्ये स्वतंञ प्लेसमेंट सेल कार्यरत असून याव्दारे ग्रामीण विद्यार्थ्याना नोकरी देण्यात प्रवरा अव्वल स्धानावर असल्याची सांगून ग्रामीण भागातील गरीब व होतकरू कुटुंबातील या विद्यार्थ्यांना निश्चितच या निमित्ताने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पाठबळ मिळणार आहे.संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,कंपनीचे अधिकारी धर्मपाल,प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे,डाॅ.आर.ए.पवार विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत नियुक्ती पञ प्रदान करण्यात आले.

कॅम्पस इंटरव्यूच्या आयोजनामध्ये संस्थेचे ट्रेनिंग आणि प्लेंसमेंटचे प्रमुख प्रा. मनोज परजणे,प्रा. हरीश दुबे, प्रा. आप्पासाहेब शेळके हे सातत्याने विद्यार्थ्यांसाठी विविध कंपन्यांना आमंत्रित करत असतात त्यातून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट होत असते.

निवड झालेल्या विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, माजी खा.डाॅ.सुजय विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ शिक्षण संचााालक डाॅ.प्रदिप दिघे ,शिक्षण संचाालिका सौ.लिलावती सरोदे कॅम्प संचालक डाॅ.आर.ए.पवार यांनी अभिनंदन केले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!